Ganpati Visarjan : गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाची जय्यत तयारी; पोलीस बंदोबस्त तैनात

Ganpati Visarjan : गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाची जय्यत तयारी; पोलीस बंदोबस्त तैनात

दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.

बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेसह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज असून गिरगाव चौपाटी येथे ठिकठिकाणी व महत्त्वाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. .विसर्जन मिरवणुकी दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com